शिटी वादक रूपेश मुरूडकर यांची सह्याद्री दूरदर्शन वाहिनीने घेतली दखल!

      

दापोली/लोकनिर्माण ( विशाल मोरे)



 दापोली तालुका, केळशी विभागातील,  इळणे गावचे सुपुत्र श्री.संदेश हरिश्चंद्र मुरुडकर (सनई वादक) आणि श्री. रुपेश हरिश्चंद्र मुरुडकर  (शिटी वादक) या दोन बंधूंनी  आपली कोकणातील लोकप्रिय पारंपारीक कला खालु  बाजा ( त्रिमुर्ती संदेश खालु बाजा पथक ) आणि रुपेश मुरुडकर यांची आगळी वेगळी शिटी वादन कला गेली कित्तेक वर्ष मुंबई शहरात अगदी प्रामाणिकपणे जिवापाड जोपासली आहे.अनेक अल्बम, अनेक राजकीय कार्यक्रम, वृत्तपत्र पुरस्कार, शासकीय कार्यक्रम, वृत्तवाहिनी असे दर्जेदार कार्यक्रम करुन आपल्या कलेला उंचावर नेले आहे.त्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कार्यक्रम केले आहेत.  त्यांचे वडील कै. हरिश्चंद्र गोविंद मुरुडकर आणि काका कै. बाब्या गोविंद मुरुडकर (सनई वादक) हे दापोली तालुक्यातील नामवंत खालु बाजा वादक होते. त्यांचे मोठे बंधू बुवा संतोष हरिश्चंद्र मुरुडकर यांचा मार्गदर्शक म्हणून मोलाचा वाटा आहे.



सह्याद्री दूरदर्शन वाहिनीने याची दखल घेतली आणि  शिटी वादक रुपेश हरिश्चंद्र मुरुडकर यांची दिलखुलास  मुलाखत घेऊन त्यांना प्रोत्साहन दिले आहे.

शनिवार दि.१६ जुलै २०२२ रोजी सायं. ७.३० वा. पुनर्प्रसारण रात्री १० वा. आणि रविवार दि.१७ जुलै २०२२ रोजी दुपारी १.३० वा. सह्याद्री दूरदर्शन वाहिनीवर प्रसारित होणार आहे.


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image