गुजरातच्या उद्योजकाची नवापूर आदिवासी भागात १००० कोटी रूपयांची गुंतवणूक, २ हजार लोकांना मिळणार रोजगार-उद्योगमंत्री उदय सामंत

 

जनरल पॉलिफिल्म्स प्रा. लि. कंपनीचा उद्योग


मुंबई प्रतिनिधी 

नवापूर सारख्या आदिवासी बहूल भागात गुजरातजमधील उद्योजक जनरल पॉलिफिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने १००० कोटी रूपयांची गुंतवणूक केली असुन यामुळे या भागातील आदिवासी बांधवाना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष २००० लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.  रोजगाराच्या संधी निर्माण झाल्यामुळे नवापूर तालुका विकासात भरारी घेईल असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. 

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बहुल नवापूर तालुक्यातील अतिरिक्त नवापूर एम आयडीसी मध्ये आज उद्योग मंत्री उदय सामंत यांचे हस्ते जनरल पॉलीफिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या प्रकल्पाचे  भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. 



यावेळी आमदार शिरिष नाईक, आमदार चंद्रकांत रघुवंशी,जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सरपंच उपस्थित होते. 

पुढे बोलताना मंत्री सामंत  म्हणाले, जनरला पोलिफिल्मस कंपनीने स्थानिक तरुणांना रोजगार देण्याची तयारी दाखविली आहे. यासाठी आदिवासी मुलांना एमआयडीसी  मध्ये काम मिळवून देण्यासाठी आयडीसीमार्फत प्रशिक्षण देण्यात येईल. 

नंदूरबार व नवापूरसाठी औद्योगिक क्षेत्रात आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याची ग्वाही देतानांच त्यांनी नवापूर एमआयडीसी ला जोडणारा ७०० मी. रस्ता मंजूर करण्यात आला आल्याचे सांगितले. तसेच नंदूरबारसाठी वाढीव नळपाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली असल्याचे सांगितले. 


गुजरात मधील जुनेद जनरल या उद्योजकाने महाराष्ट्रातील आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर एमआयडीसी येथे आपल्या उद्योगासाठी निवड केली आहे. ७० एकर जागेत सुमारे १००० कोटी रु.ची गुंतवणूक असलेल्या जनरल पॉलिफिल्म प्रकल्पाच्या  माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष १५०० ते २००० युवकांना रोजगार मिळणार आहे. एक वर्षात उद्योग सुरू होणार असुन पॅकेजिंगसाठी लागणारे पॅालीफिल्म्स याठिकाणी तयार करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.