दहिवलकरवाडीचा पूलाचे सिद्धेश ब्रीद यांच्या हस्ते भूमिपूजन सिद्धेश ब्रीद स्वखर्चातुन उभारणार पूल स्वातंत्र्य काळापासूनची मागणी सिद्धेश ब्रीद करणार पूर्ण


संगमेश्वर लोकनिर्माण धनंजय भांगे

 तालुक्यातील कडवई ग्रामपंचायत हद्दीतील दहिवलंकरवाडीच्या स्वातंत्र काळा पासून ब्रिजची मागणी होती. येतील आमदार तसेच खासदार यांच्याकडे येथील ग्रामस्थांनी अनेक वेळा मागणी केली मात्र कोणीच लक्ष दिले नाही आणि आमच्या मागणीकडे सगळ्यांनी पाठ फिरवली त्यामुळे येथील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. मात्र या पुलाचा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश ब्रीद यांच्याकडे मांडला त्यांनी क्षणाचा विचार न करता आमचा ब्रिजचा प्रश्न तात्काळ मार्गी लावतो सांगत त्यांनी आज कडवई दहिवली वाडीच्या ब्रिजचे भूमिपूजन केले. यावेळी ग्रामस्थांनी सिद्धेश ब्रीद यांचे सर्वांनी एकत्र येत आभार मानले.




          हा भूमिपूजन सोहळा सिद्धेश ब्रीद यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी कडवई माजी सरपंच वसंत उजगावकर, डॉ. अमित ताठरे,बंड्या मयेकर, मयूर लिबूकर, कल्पेश ओकटे, संतोष पाचकुडे, बापू कदम, मारुती शिंदे अभिजित शिंदे, नरेश गुरव, दत्ताराम देवरुखकर, सुनील कडवइकर,राकेश खसासे, रमेश किंजलकर,राजू हरेकर, नंदू फडकले, गावकर शांताराम दहिवलकर, भूषण दहीवलकर,विजय दहिवलकर,रवींद्र दहिवलकर, चंद्रकांत दहिवलकर,सखाराम दहिवलकर, अनंत दहिवलकर, अर्जुन दहिवलकर, सतीश दहिवलकर, विनायक दहिवलकर, सलीम झगडे, मनोज वहाळकर आदी ग्रामस्थ, पदाधिकारी उपस्थिती होते.