मुंबई गोवा महामार्गावर श्री संदीप फडकले यांचा अतूट प्रयत्न


चिपळूण लोकनिर्माण शहर प्रतिनिधी( स्वाती हडकर)



महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय श्री हिंदू जननायक राज साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने खेड तालुक्याचे तालुका अध्यक्ष संदीप फडकले यांच्या प्रयत्नाने मुंबई गोवा हायवे पासून ते अजगनी ग्रामपंचायत पर्यंत बहिर्वक्र आरसे बसवण्यात आले. जीवाजवळ खेळणारा हा महामार्ग असल्यामुळे अजगनी ग्रामपंचायत पर्यंत वळणाचे रस्ते असून तेथे प्रवाशांना धोका निर्माण होत असल्यामुळे आज आगळावेगळा उपक्रम  संदीप फडकले  एक मोठा मुद्दा हाती घेतला आहे व ते मनापासून एक चांगला उपक्रम राबवीत आहेत. त्यांच्यासह उपस्थित अजय शिगवण, सचिन बुरटे कंपनीचे अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.