कार्तिकी एकादशी पंढरपूर यात्रेनिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ग्रुप बुकिंग बस मध्ये महिला व ज्येष्ठ नागरीक यांना ५० टक्के प्रवास भाडे सवलत मिळणेसाठी आमदार डॉ.राजन साळवी यांची परिहवन मंत्र्यांकडे मागणी

 

राजापूर / लोकनिर्माण (सुनील जठार)


  कार्तिकी एकादशी पंढरपूर यात्रे करीता कोकण विभागातून रत्नागिरी जिल्हयातील प्रत्येक गावांमधून अनेक वारकरी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बसचे ग्रुप बुकिंग करŠन प्रवासाचा लाभ घेतात. सदर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ग्रुप बुकिंग बस मध्ये महिला व ज्येष्ठ नागरीक  यांना ५० टक्के प्रवास भाडे सवलत मिळणेच्या अनुषंगाने परिवहन मंत्र्यांना निवेदन देऊन सकारात्मक निर्णय होण्याची मागणी केली. 

महाराष्ट्र शासनाने महिला प्रवाशांकरीता लागु केलेली ५०टक्के तिकिट सवलत ही ज्येष्ठ नागरीक, अमृत जेष्ठ नागरीक यांना फक्त नियमित टप्पे वाहतूक करणा-या बसमध्ये दिली जात आहे. परंतु वारकरी संप्रदायाकडून ग्रुप बुकिंग केलेल्या एस.टी.बस मध्ये ५०टक्के सवलत देण्यात येत नाही.

त्यानुषंगाने आमदार डॉ.राजन साळवी यांनी परिवहन मंत्र्यांना निवेदन दिले असून सदर निवेदन द्वारे सन २०२३ मध्ये गौरी-गणपती सणाकरीता मुंबई,ठाणे,पुणे विभागातून कोकणात येणा-या एस.टी.बसच्या जादा वाहतुक व ग्रुप बुकिंग करीता महिला प्रवासी, ज्येष्ठ नागरीक, अमृत ज्येष्ठ नागरीक यांना ५०टक्के प्रवास भाडयाची सवलत देण्यात आली होती. त्याप्रमाणे कार्तिकी एकादशी पंढरपूर येथे प्रवास करणारे वारकरी यांना ५०टक्के सवलत मिळणेच्या  अनुषंगाने सकारात्मक निर्णय व्हावा विनंती केली आहे.

Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अखंडीत वितरीत होणारे लोकनिर्माण मराठी ई - वृत्तपत्र
Image
मन: सामर्थ्यदाता या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या अनुभवसंकिर्तना सह भक्तीरसनाचा सत्संग सोहळा उत्साहात संपन्न
Image
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image