मराठ्यांचे एकट्याचे नाहीतर सर्व समाजाचे जातीनिहाय सर्वेक्षण करा - मंत्री छगन भुजबळ यांचा शासनाला सवाल

 

हिंगोली /लोकनिर्माण (बाबुराव ढोकणे)

 मराठ्यांचे एकट्याचे नव्हे तर सर्व जातीची जनगणना करा तरच दूध का दूध आणि पाणी का पाणी असे म्हणत शासनाला सवाल केला आहे.



येथील रामलीला मैदानावर रविवारी ओबीसी समाजाचा दुसरा एल्गार मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रकाश शेंडगे, बी. डी. चव्हाण, ऍड. नाईक यांच्यासह ओबीसी समाजाचे नेते उपस्थित होते.



सध्या मराठा समाजाला  सरसगट कुणबी आरक्षण द्यावे यासाठी मराठा योद्धा जरांगे यांनी दोन महिन्यांपासून राज्यात ठिक ठिकाणी मेळावे घेत आहेत. त्यांच्या सभांना लाखोंच्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहत आहेत. शासनाला  ओबीसीतून  कुणबी दाखले देण्यासाठी २४ डिसेंबरची डेडलाईन देण्यात आली . दुसरीकडे मात्र ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विरोध केला असून , स्वतंत्र आरक्षण द्यावे असे म्हटले आहे. अरक्षणावरून दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.

पुढे भुजबळ म्हणाले, ओबीसीतून आरक्षण मागून आम्हालाच बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र ते आम्ही कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. यासाठी मोठा लढा उभारू असे त्यांनी जरांगे ना टोला लागावला .यावेळी रामलीला मैदानावर लाखोंच्या संख्येने ओबीसी समाज बांधवांची उपस्थिती होती.