बार्टी कडून संविधान याविषयावर स्पर्धा परीक्षा घेण्यात आली

 

वसमत /लोकनिर्माण (मिलिंद आळणे)



तालुक्यातील करजाळा येथे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाची स्वायत्त संस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ गोवंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समतादूत  अँड रहिम कुरेशी, मिलिंद आळणे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. अध्यक्ष स्थानी नितीन जाधव होते तर प्रमुख पाहुणे मारोती दिपके, प्रजाताई इंगोले,हे होते. सर्वप्रथम महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संविधान या विषयावरील परीक्षेची  सुरुवात संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन करून  करण्यात आली.  26 नोव्हेंबर1949 रोजी भारतीय संविधान देशाला अर्पण केले त्या निमित्ताने संविधानाच्या बाबतीत जनजागृती व्हावी यासाठी समतादूत मिलिंद आळणे,  रहिम कुरेशी यांनी घेतली.  मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता  सखाराम थोरात ,विठ्ठल भूक्तर,बाबासाहेब भूक्तर,मनीषा थोरात परिश्रम घेतले.