लोकनिर्माण वृत्तपत्राचा वर्धापनदिन अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम येथे उत्साहात साजरा

 

चिपळूण/ लोकनिर्माण (स्वाती हडकर)



लोकनिर्माण वृत्तपत्राचा चवदावा वर्धापन दिन आणि  संपादक बाळकृष्ण कासार यांचा वाढदिवस  हे एकाच दिवशी येत असल्याने  त्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी म्हणून दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. या वर्षी लोकनिर्माण वृत्तपत्राच्या प्रत्येक तालुक्याच्या  ठिकठिकाणी असलेल्या गरीब विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा गोडवा येण्यासाठी  शालेय शैक्षणिक साहित्याचा फराळ (वह्या, पेन इ.) वाटून  साजरा करण्यात आला. दरवर्षी हे कार्यक्रम एकाच ठिकाणी केले जात होते. परंतु याच दिवशी दिवाळीचा सण आल्याने ते प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी करण्यात आले.‌ 




      



चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी येथील श्रमिक सहयाेग संचलित प्रयाेगभूमी काेळकेवाडी- शिक्षण केंद्र अनाथाश्रमा मधील विद्यार्थ्यांना वह्या, पेन इ. शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.‌ तर गाणे खडपोली येथील लिलावती बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचालित लिलाबाई आधार आश्रम गाणे याठिकाणी असलेल्या वृद्धाबरोबर हितगुज करण्याचा आनंद लुटून दिवाळीच्या फराळाचे वाटप  करण्यात आले. त्याचबरोबर एक मदतीचा हात म्हणून देणगी स्वरुपात मदत करण्यात आली. याच ठिकाणी संस्थेच्या सभागृहात संपादक बाळकृष्ण कासार यांचा संस्थेच्या पदाधिकारी आणि आबालवृद्ध यांच्या सोबत केक कापून तसेच वाढदिवस साजरा करण्यात आला. 



         यावेळी संस्थेचे संचालक किशोर शिंदे, श्रमिक सहयोग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजन इंदुलकर, कोळकेवाडी अनाथाश्रमाचे शिक्षक मोहिते गुरुजी, लोकनिर्माण वृत्तपत्र समुहाचे संपादक बाळकृष्ण कासार, सहसंपादक सौ. सुविधा कासार, तालुका प्रतिनिधी जमालुद्दीन बंदरकर, प्रतिनिधी चंद्रकांत खोपडकर, शहर प्रतिनिधी सौ. स्वाती हडकर, विद्यार्थी, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.