टिळेकर डिजिटल फोटो स्टुडिओचे रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती सोहळा थाटात संपन्न

 राजापूर/ लोकनिर्माण (सुनील जठार) 

राजापूर शहरातील युवा छायाचित्रकार संदेश टिळेकर यांनी १९९८ रोजी राजापूर शहरातील बाजारपेठेत आपला टिळेकर फोटो स्टुडिओ राजापूर या नावाने फोटो स्टुडिओ सुरू केला या टिळेकर डिजिटल फोटो स्टुडिओ ला ११ नोव्हेंबर २०२३ रोजी २५ वर्ष पूर्ण झाली या रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त छायाचित्रकार संदेश टिळेकर यांचे टिळेकर डिजिटल फोटो स्टुडिओत श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती तसेच या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त  स्वरांजली ग्रुप राजापूर प्रस्तुत कराओके हा राजापूर शहरातील स्थानिक कलाकारांचा संगीत रजनीचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात विविध चित्रपटातील मराठी हिंदी मिक्स गाणी सादर केली या कार्यक्रमाचा  राजापूर शहर तालुक्यातील नागरीक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


राजापूर शहरातील प्रख्यात छायाचित्रकार कै. यशवंत गोविंद नाखरे गुरूजी यांचेकडे त्यावेळची कृष्णधवल फोटोग्राफी व कलर फोटोग्राफी कला संदेश टिळेकर यांनी आत्मसात केली त्यानंतर त्यांनी आपले फोटोग्राफीतील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ आऊटडोअर फोटोग्राफी केली व त्यानंतर मिळालेल्या उदंड प्रतिसादाच्या जोरावर  यशवंत नाखरे गुरूजी यांचे कृपाशीर्वादाने स्वमालकीचा टिळेकर फोटो स्टुडिओ राजापूर बाजारपेठेतील आपल्या रहात्या घरात सुरू केला. 

१९९८ ला संदेश टिळेकर यांनी फोटो स्टुडिओ सुरू केला मात्र १९९८ ते २०२३ या कालावधीत फोटोग्राफीत फोटोग्राफी व्हिडिओग्राफी कॅमेरे यात काळानुसार होत गेलेले बदल यात त्यांनी माघार न घेता त्यात्यावेळची फोटोग्राफी आत्मसात केली आजही ते फोटोग्राफीतील आधुनिक डिजिटल फोटोग्राफीतील यंत्रसामुग्रीसह आधुनिक मिररलेस कॅमे-र्यावर उत्कृष्ट फोटोग्राफी व सिनेमॅटोग्राफी करत आहेत 

छायाचित्रकार संदेश टिळेकर यांनी निव्वळ फोटोग्राफी न करता अनेक सामाजिक कार्यात नावलौकिक मिळवला आहे. २००३ नंतर त्यांची पत्नी सौ. प्रेरणा संदेश टिळेकर यांनी संदेश टिळेकर यांचेकडून फोटोग्राफी कला आत्मसात केली त्यानंतर त्यांनी स्वताचा टिळेकर डिजिटल फोटो स्टुडिओ शाखा क्र. २ राजापूर शहरातच सुरू केला आज त्यांचे संदेश टिळेकर यांना फोटोग्राफी क्षेत्रात खुप मोलाचे सहकार्य मिळत आहे. 

सन २०१६/१७ या कालावधीत संदेश टिळेकर यांनी राजापूर तालुक्यातील व शहरातील सर्व फोटोग्राफर यांना एकत्रित करून राजापूर तालुका फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशनची स्थापना केली या असोसिएशनचे त्यांनी संस्थापक अध्यक्ष म्हणून काही वर्ष काम पाहिले त्यानंतर त्यांचे कामाची पोचपावती म्हणून त्यांना रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशनवर त्यांची जिल्हा संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आजही ते रजिस्टर असलेल्या रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशन दक्षिण रत्नागिरी जिल्हा जिल्हा संघटक म्हणून काम पहात आहेत  तसेच ते रजिस्टर असलेल्या राजापूर तालुका फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशनचे ते सचीव म्हणून सध्या ते काम पहात आहेत. संदेश टिळेकर यांनी राजापूर तालुक्यातील व शहरातील सर्वांच्या सहकार्याने स्थापन केलेल्या राजापूर तालुका फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशनला आॅल महाराष्ट्र फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशनचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. 

संदेश टिळेकर यांचे टिळेकर डिजिटल फोटो स्टुडिओच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अनेकांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष भेटून संदेश टिळेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले शुभाशिर्वाद दिले . 

अशारीतीने  टिळेकर डिजिटल फोटो स्टुडिओचा रौप्य महोत्सवी वर्ष पूर्ती सोहळा कार्यक्रम थाटात संपन्न झाला.