इनोव्हाच्या धडकेने अॅक्टिव्हा चालक गंभीर जखमी, इनोव्हा चालक पोलिसांच्या ताब्यात


चिपळूण/ लोकनिर्माण (स्वाती हडकर)

तालुक्यातील कापसाळ नजीक असलेल्या पेट्रोल पंपासमोर इनोव्हाच्या धडकेने अॅक्टिव्हा चालक वसंत आग्रे राहाणार चिंचघरी हे आपल्या एक्टीव्हा वरुन आपल्या बहिणीला कामथे येथे सोडण्यासाठी जात असता कापसाळ पेट्रोल  पंपासमोर मुंबईकडे भरधाव जाणाऱ्या इनोव्हाच्या धडकेने अॅक्टिव्हा चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्या मागे येत असलेल्या मोटार बाइकला ही धडक देऊन बाईक स्वार ही जखमी झाला असून जखमींना कामथे शासकीय उप रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमी वसंत आग्रे यांना लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. फरार इनोव्हा चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.