खेर्डी मधील सौ. गीता मनोज दाभोळकर यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती

 

चिपळूण/लोकनिर्माण (स्वाती हडकर)



खेर्डी येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. गीता मनोज दाभोळकर यांची महाराष्ट्र शासनाने  विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.  राज्यातील  खेर्डी ग्रामपंचायतीच्या विभागात दाखले काढल्यानंतर त्याच्या सत्य प्रतीवर साक्षांकित करण्यासाठी चिपळूण तहशिलला जावं लागत होते. या साठी संपूर्ण दिवस वाया जावून आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. सौ. गीता दाभोळकर यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सत्य प्रतीवर साक्षांकित करण्यासाठी आता हेळसांड करावी लागणार नाही. त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल आजुबाजूच्या परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून खेर्डी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच  सौ. जयश्रीताई खताते, माजी ग्रामपंचायत सदस्य वैशाली कुंभार,  सौ. वर्षा खताते व खेर्डी खतातेवाडी मधील  महिला मंडळातील  सर्व सदस्यांनी पुष्पगुच्छ देवून  शुभेच्छा दिल्या.

Popular posts
मन: सामर्थ्यदाता या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या अनुभवसंकिर्तना सह भक्तीरसनाचा सत्संग सोहळा उत्साहात संपन्न
Image
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image