नेरे येथे आपुलकीचा दिपोत्सव - उडान २०२३ संपन्न !


डोंबिवली/लोकनिर्माण (शशिकांत सावंत)

महाराष्ट्र लोककल्याणकारी सेवा संस्था आणि गिरीजा फाउंडेशन च्या विशेष सहकार्याने अमरदिप बालविकास फाउंडेशन आयोजित २६/११ च्या आतंकवादी हल्ल्यात वीर सुपुत्रांना समर्पित , वंचित व तळागाळातील बालक आणि जेष्ठ नागरिकांसोबत आपुलकी चा दीपोत्सव रविवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी नेरे येथे संपन्न झाला. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा "कलाविष्कार उडान २०२३" सादर करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन एन.डी.खान व  सुनंदा गणेश सपलिंग यांनी केले होते. तसेच कार्यक्रमाची 'संकल्पना व नियोजन' एन.डी.खान यांचे होते.



 या कार्यक्रमाला निवृत्त पोलीस सहआयुक्त एकनाथ खोलम, सिनेअभिनेत्री वर्षा पडवळ, हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे, , संगीतकर मधू, प्रा.कुसुम मधाळे, रेडकर,आदिवासी समाजासाठी झटणारे विलास घरत, प्रा.अंशुल शर्मा, स्नेहा चांदोरकर, पुष्पा सकपाळ,वीर स्वामी संस्थेचे प्रा.संजय हिरेमठ, भाग्यश्री भुजबळ,, लिटिल आयडीयल किड्स चे पूनम गुप्ता, मनोज गुप्ता , वूमन पावर चे  जितेन्द्र टी.सर (  टोनी) व त्यांचे सभासद,महामुंबई चॅनेल चे संपादक मिलिंद खारपाटील, आपला महाराष्ट्र चे संपादक सुनील ठाकूर, युवास्तंभ  न्युज नेटवर्क चे प्रतिनिधी, पत्रकार दिलीप मगर,अक्कलकोटे क्लासेच्या,  छाया अक्कलकोटे , शैलेन्द्र अक्कलकोटे शिवशंभू संघटनेचे विजय भोसले,,कफ चे राजकुमार ताकमोघे, साहित्यिक व कवी विलास देवळेकर, जेष्ठ समाजसेवक व पत्रकार शशिकांत सावंत, व्ही, रेड्डी जेष्ठ कार्यकर्ते अब्दुल मुकादआदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पणती लावून दीपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी दीपक कदम यांनी घेतलेला गाण्याचा तास  सुरेख रंगला.यावेळी छोट्या छोट्या मुलांनी देखील झकास नृत्य सादर केले. निवृत्त पोलीस सहआयुक्त एकनाथ खोलम यांनी २६/११ चा "चित्तथरारक प्रसंग वर्णन" करून एक सुमधुर गाणी गायले. ऍड सुरेखा भुजबळ, विजय मोरे, सुखदा ठाकूर, महेक शेख, संध्या भुजबळ ,अंजली संत, अरविंद शिंदे आणि अनंत मुळे यांच्या गाण्याला टाळ्या आणि  प्रतिसाद मिळाला. अनेक गायकांनी सादर केलेल्या देशभक्ती पर गाण्यांनी अंगात वीर रस संचारला.विजय मोरे यांनी संविधान वाचन केले.संजीवन म्हात्रे यांनी मोबाईल या विषयावर प्रबोधन करून सर्वाना पोट धरून हसवले.डॉ स्वरांजली गायकवाड यांनी Spritual Tapping and clapping tharapy सर्वांकडून करून घेतली. तसेच साहीत्यिक व कवी विलास देवळेकर यांनी म्युझिकल इको साऊंड सिस्टिम हास्य कविता सादर केली. या कार्यक्रमात "अमरदीप बालविकास फाऊंडेशन" तर्फे हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे यांना त्यांच्या कला क्षेत्रातील उत्तुंग कार्याबद्दल "टी.एम.जी.ग्लोबल आयकॉन पुरस्काराने" सन्मानित करण्यात आले.तर वुमेन पावर अँन्ड सोशल अवेरनेस फाऊंडेशन च्या वतीने गिरिजा फाऊंडेशनच्या सुनंदा सपलिंग  व अमरदिप बालविकास फाउंडेशन च्या सलमा खान यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी चित्रकला स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या आश्रमातील बालकांना सन्मानित करण्यात आले.

    सदर कार्यक्रमास डॉ.डी.के महाडीक , यास्मिन मोलकर, छाया अक्कलकोटे स्वाती हिरवे  श्रुती उरणकर आणि पूनम गुप्ता यांनी विशेष सहाय्य केले.

      कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश चव्हाण, सौ. मीना ताकमोगे, डी.डी.विसपूते चे विद्यार्थी , लिटिल आयडीयल किड्स चे सर्व शिक्षक, वीरस्वामी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्थेचे विद्यार्थी,गोपाळ सपलिंग, सलमा खान व आश्रमातील विद्यार्थी इत्यादीनी परिश्रम घेतले. तसेच उत्तम आयोजन आणि नियोजन केले होते.