चिपळूण तालुक्यातील आकले, कादवड, दादर, नांदिवसे विभागातील नद्यांमधून बेसूमार वाळू उत्खनन सुरू, प्रशासनाचे दुर्लक्ष!

 

चिपळूण/लोकनीर्माण (संतोष शिंदे)

चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागांमधील आकले,  कादवड, दादर, नांदिवसे गावातील नद्यांमधून  जेसीबी ने खोदकाम करून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. त्याचबरोबर  नदीमधील दगड-गोटे याची सूद्धा वाहतूक केली जात आहे. त्यामुळे नदीमध्ये मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. परिणामी वाळूचा निचरा झाल्याने जमिनीतील पाणी साठा कमी होऊन पाण्याचा दुष्काळ पडण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर पूर्ण नदी पात्रात पडलेल्या खड्ड्यांमुळे पावसाळ्यात नदीचा प्रवाह बदलून पूर-परिस्थिती निर्माण होऊन नुकसान होऊ शकते.

याविषयी माहिती घेतली असता कादवड गावातील एक स्थानिक रहिवासी हे आपल्या ताब्यातील  ट्रॅक्टर मधून  वाहतूक करतात अशी तेथील स्थानिकांडून कुजबुज सुरु आहे. तरी संबंधित प्रशासकीय अधिकारी हे याकडे लक्ष देऊन कारवाई करतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Popular posts
मन: सामर्थ्यदाता या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या अनुभवसंकिर्तना सह भक्तीरसनाचा सत्संग सोहळा उत्साहात संपन्न
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अखंडीत वितरीत होणारे लोकनिर्माण मराठी ई - वृत्तपत्र
Image
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image