डॉ.लक्ष्मण शिवणेकर यांच्या गजलामृत या गजलसंग्रहाला प्रथम पुरस्कार


मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी 

मुंबईतील मराठा मंदिर या नामांकित संस्थेच्या साहित्य शाखेच्या वतीने घेण्यात आलेल्या  साहित्य पुरस्कार २०२२ करता  विविध साहित्य प्रकारासाठीचा पुरस्कार प्रदान सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.  



डिंपल प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या डॉ. लक्ष्मण शिवणेकर यांच्या *गजलामृत* या पहिल्या गजलसंग्रहास *प्रथम पारितोषिक* प्राप्त झाल्याच्या निमित्ताने प्रमुख अतिथी पद्मविभूषण अणुभौतिक शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर व प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ साहित्यिक डॉ. नरेंद्र जाधव यांच्या शुभहस्ते प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करून रोख रक्कम स्मृतिचिन्ह व सम्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.  गजलामृत या संग्रहास मिळालेला हा दुसरा पुरस्कार आहे.

शनिवार दिनांक ९ डिसेंबर २०२३ रोजी मुंबई सेंट्रल येथील मराठा मंदिरच्या श्रीमंत जिवाजिराव शिंदे सभागृहात संपन्न झालेल्या समारंभ प्रसंगी प्रदीप विचारे, संजय राणे , विलासराव देशमुख , दिलीप चव्हाण हे संस्थेचे पदाधिकारी व्यासपीठावर तर  स्पर्धक साहित्यिक, त्यांचे नातेवाईक, परीक्षक सभागृहात उपस्थित होते. सस्स्वती पूजनाने सुरु झालेला कार्यक्रम राष्ट्रगीताने समाप्त झाला.



Popular posts
मन: सामर्थ्यदाता या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या अनुभवसंकिर्तना सह भक्तीरसनाचा सत्संग सोहळा उत्साहात संपन्न
Image
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image