संगमेश्वर महोत्सवात मुलांचा खेळ सूरु असताना अपघात सुदैवाने जीवावरचे किरकोळ जखमांवर निभावले

 

संगमेश्वर/लोकनिर्माण (सत्यवान विचारे) 


संगमेश्वर पावटा मैदानात संगमेश्वर महोत्सव सुरु असून या महोत्सवा साठी पुर्ण तालुक्यातून ग्रामस्थ आपल्या मुलांना घेऊन येत असतात, या महोत्सवा मधे विविध खाद्य पदार्थ, अणेक प्रकारच्या ग्रहपयोगी वस्तू, खेळणी आदि सोबत लहान मुलांसाठी विविध गेम, उंच उंच आकाश पाळणे, बळून आदि मनोरंजनात्मक कार्यक्रम असल्याने पालकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

मात्र काही खेळ हे लहान मुलांना कसे धोकादायक आहेत, वेळप्रसंगी जीवावर बेतणारे आहेत हे सोमवार ता ११ डिसेंबर च्या रात्री दिसून आले आहे, निव्वळ नशिबानेच जीवावरचे किरकोळ दुखापतीवर निभावले असल्याचे बोलले जात आहे.

या विषयी मिळालेल्या माहिती नुसार सोमवारी रात्री संगमेश्वर महोत्सव पाहण्यासाठी गर्दी झाली होती.

लहान मुले आकाश पाळणा वैगेरे खेळाचा थ्रील अनुभवत असताना अचानक त्या पाळण्याच्या बलून मधील हवा गेली आणि काही समजायच्या आत उंचावरून मुले धडाधड खाली कोसळली तर काही बलून मध्येच अडकल्याने घुसमटली, एकच हाहा:कार माजला, मात्र सर्व मुले सुरक्षित असल्याने पालकांनी निश्वास टाकला, तर काही पालकांनी बलून चालकाला धारेवार धरतं संगमेश्वरी प्रसाद दिला.

काहींनी हे धोकादायक खेळ बंद करण्याची मांगणी केली असता थोडावेळ खेळ बंद ठेवण्यात आला. संतापलेले पालक संयोजकांना शिव्या शाप देत परत गेल्याचे पाहुन जसे काही घडलेच नाही या आर्विभावात पुन्हा खेळ सुरु करण्यात आला.

आयोजकांच्या हलगर्जीपणामुलेच आज अनर्थ घडला आहे. आज अपघात टळला असला तरी पुढे होणार नाही याची श्वासवती वाटत नाही. कारण गतवेळी देखील असाच अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे.


Popular posts
मन: सामर्थ्यदाता या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या अनुभवसंकिर्तना सह भक्तीरसनाचा सत्संग सोहळा उत्साहात संपन्न
Image
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image