राजापूर /लोकनिर्माण प्रतिनिधी
राजापूर तालुक्यातील डोंगर येथुन कॉंपुटर कोर्स साठी येणार्या युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी राजापूर मधील वाडा येथील जयान अखिल सोलकर याच्यावर राजापूर पोलिसानी भादवी कलम ३५४ अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असुन जयान सोलकर याला मारहान केल्याप्रकरणी डोंगर येथील सउद सजन मस्तान व रिजवान हयात खान या दोघांवर कलम ३२४ अन्वये मारहानीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती राजापूर पोलिसानी दिली आहे .
तालुक्यातील डोंगर येथुन एक युवती नेहमी राजापूर येथील जिजा कॉंप्युटर सेंटर येथे दररोज संगणक प्रशिक्षणासाठी येत असुन गेल्या काही दिवसापासुन राजापूर मधीलवाडा येथील राहणारा जयान सोलकर हा सातत्याने त्रास देत होता . याबबातची तक्रार आज सायंकाळी उशिरा सदर युवतीने राजापूर पोलिसात दाखल करताना जयान याने राजापूर शहरातील डोसानी प्लाझा येथे आपणास अडवुन विनयभंग केल्याचे म्हटले आहे . तिच्या तक्रारीवरुन जयान अखिल सोलकर याच्यावर राजापूर पोलुसानी भादवी कलम ३५४ अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे .
दरम्यान जयान हा सदर युवतीच्या मोबाइलवर अश्लील चित्रफित टाकत होता याचा राग येवुन डोंगर येथील त्या युवतीचे नातेवाइक असलेले सउद सजन मस्तान व रिजवान हयात खान या दोघानी आज सायंकाळी राजापूर बाजारपेठेतील काळसेकर मेडिकलच्या समोर जबर मारहान केल्याची घटना घडली आहे . त्यावरुन राजापूर पोलिसानी सउद सजन मस्तान व रिजवान हयात खान या दोघांवर मारहान केल्याप्रकरणी भादवी कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे . या दोन्ही प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक शिल्पा वेंगुर्लेकर या करत आहेत .