मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी
श्री. व्याघ्रेश्वर सेवा मंडळ आयोजित कदमवाडीचा राजा दिनदर्शिका २०२४ प्रकाशन सोहळा नुकताच दादर मुंबई येथे राजा श्री. छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय दादर येथे यशस्वी उद्योजक श्री. अशोक वनगे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रम प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या वतीने दिप प्रज्वलन करून गणराया आणि शिवरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात केली.
श्री. व्याघ्रेश्वर सेवा मंडळ हे गेली २४ वर्ष सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कला क्रीडा अशा प्रकारे विविध क्षेत्रात सामाजिक दृष्टिकोनातून काम करत आहे त्यातीलच एक काम म्हणजे आपल्या मंडळाच्या माध्यमातून दिनदर्शिका वाटपाचे कार्यक्रम दरवर्षी राबविण्यात येते. या प्रसंगी श्री. अशोक वनगे यांनी ग्रामीण भागातील शाळा, तेथील शिक्षण पद्धती आणि मुले यावर भाष्य करून आपल्या गावातील गरजू मुलांना चांगले शिक्षण कसे मिळेल यासाठी प्रयत्न करून त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहायची गरज आहे याची जाणीव करून दिली. या शुभप्रसंगी व्यासपीठावर मंडळाचे कार्याध्यक्ष दिलीप कदम, मुख्य कार्यवाहक सुभाष भेकरे, बामणोली सुपुत्र तसेच भारतीय जनता पार्टी विक्रोळी विधानसभा उपाध्यक्ष संतोष गोरीवले, श्री. चंडिकाई कालकाई काळेश्वरी विकास मंडळ मुंबई अध्यक्ष लक्ष्मण गोणबरे आणि सचिव सुनिल धोंडू कदम, मंडळाचे माजी सल्लागार महादेव कदम, मधलीवाडीतून कल्पेश कदम, बामणोलीमधून लक्ष्मण तांबे यादी मान्यवर तसेच मंडळाचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते. तसेच कार्यक्रमासाठी मंडळाचे रामचंद्र विठोबा कदम, भगवान कदम, सुरेश बारक्या कदम, मारुती कदम, अशोक कदम यांची विशेष उपस्थिती लाभली.
मंडळाचे कार्याध्यक्ष दिलीप कदम यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाच्या मुंबई शाखेचे सचिव किरण कदम यांनी केले व मंडळाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली. या उपक्रमासाठी सर्व जाहिरातदार आणि दिलीप कदम, किरण कदम, विजय भेकरे, नरेश कदम आणि सचिन शांताराम कदम यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रकाशन सोहळा कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे खजिनदार विजय भेकरे, उपसचिव राकेश कदम, उपाध्यक्ष तुकाराम कदम, उपखजिनदार सुभाष कदम, तसेच रविंद्र कदम, महेश कदम, उमेश कदम, हरेश कदम, सचिन कदम, प्रदीप कदम, मिलिंद कदम आणि इतर सभासद यांनी परिश्रम घेतेले. उपस्थित सर्व मान्यवरांनी मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक करून रौप्य महोत्सवी वर्षास शुभेच्छा दिल्या.
हा कार्यक्रम श्री. व्याघ्रेश्वर सेवा मंडळाच्या कदमवाडीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या संकल्पेनेतून साकारण्यात आला.*