मुंबई/लोकनिर्माण ( गणेश तळेकर)
दामोदर नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन बचाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सहकारी मनोरंजन मंडळाच्या शिष्टमंडळाने काल मा सांस्कृतिक मंत्री श्री सुधीर मनगुंटीवार साहेब यांची भेट घेऊन त्यांना यासंबंधी निवेदन दिले. शंभर वर्षे जुने दामोदर नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन मंडळ यांच्या वास्तूच्या तोडकामाविषयी तात्काळ मा. मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्तांशी बोलून योग्य ती कार्यवाही करण्याचं आश्वासन त्यांनी सहकारी मनोरंजन मंडळाच्या शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे आता दामोदर नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन मंडळच्या कार्यालय पुनर्बांधणी संबधी आश्वासकता निर्माण झाली आहे.