क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेच्या दिनदर्शिकेचे केळवली महालक्ष्मी मंदीर येथे प्रकाशन

 

 धारपवार बांधवभेट व विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण संपन्न


राजापूर / प्रतिनिधी 

   तालुक्यातील केळवली श्री देवी महालक्ष्मी मंदीर येथे क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेच्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व विविध स्पर्धांचा बक्षिस वितरण सोहळा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड . राजन पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

 केळवली येथील धारपवार बांधवांच्या श्री देवी महालक्ष्मी  मंदीर येथे बुधवार दिनांक ६ डिसेंबर २०२३ रोजी केळवली येथील धारपवार बांधवांचा बांधवभेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . यावेळी क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले . राजापूर तालुक्यातील केळवली या गावात सर्वाधिक धार पवार कुटुंबे राहत आहेत . तर याच कार्यक्रमात संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या गणेश सजावत स्पर्धा , माझी गौराइ स्पर्धा व रांगोळी स्पर्धा यांचा बक्षीस वितरण सोहळाही पार पडला . 

    केळवली येथील या बांधव भेट मेळाव्यात संस्थेचे इतिहास संकलक संतोष (सनीदादा ) पवार यानी पवार घराण्याचा संपुर्ण इतिहास सर्वांसमोर मांडला. पवार घराण्याची उत्पती  , सम्राट  राजा विक्रमादित्य व राजा भोज यांच्या कालखंडातील तेजस्वी इतिहास संतोष पवार यानी उपस्थितांसमोर मांडला . तर क्षत्रिय धार पवार संस्थेचे रत्नागिरी उपाध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्हा समंवयक तुषार विश्वासराव यानी पवार - ठोसर याबबतचा इतिहास मांडताना मुळ पवार ठोसर कसे झाले याबाबतची माहिती उपस्थिताना दिली . 

    क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेचे सचिव अविनाश पवार व अध्यक्ष ॲड . राजन पवार यानी उपस्थिताना संस्थेच्या कार्याची माहिती दिली . या कार्यक्रम प्रसंगी क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष ॲड . राजन पवार , सचिव अविनाश पवार , कार्याध्यक्ष सचिन पवार , खजिनदार विकास पवार ,रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरज पवार , रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष तुषार विश्वासराव , राजापूर तालुकाध्यक्ष विनोद पवार , गणेश बने , अनिल दळवी , रघुनाथ पवार , इतिहासप्रमुख संतोष पवार , राजापूर पंचायत समितीचे माजी सदस्य बाजीराव विश्वासराव ,वैभववाडी सिंधुदुर्ग येथील दिपक पवार , केळवली येथील महालक्ष्मी मंदिराचे प्रमुख मानकरी लहु पवार , जनार्दन पवार , मनोहर पवार तसेच माजी सरपंच रमेश ठोसर , सुरेश पवार , मनोहर पवार , धोंडु पवार , राजाराम पवार , गजानन पवार, प्रकाध यशवंत पवार ( गुरुजी) , विनोद पवार (पाचल )  व केळवली येथील धारपवार कुटूंबातील महिला वर्गासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकाश यशवंत पवार यानी केले. 


Popular posts
मन: सामर्थ्यदाता या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या अनुभवसंकिर्तना सह भक्तीरसनाचा सत्संग सोहळा उत्साहात संपन्न
Image
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image