चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी
तालुक्यातील धामेली भोजने वाडी येथे दरवर्षी रामनवमी उत्सव विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरे केले जातात. मागील वर्षी पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी तालुक्यातून अनेक पालखी नृत्य पथकांनी सहभाग घेतला होता. या वर्षी दिवसभर विविध कार्यक्रम होणार असून सकाळी ९ ते १० वाजता ग्रामदेवता श्री देव महादेव भानोबा काळेश्री पालखी मिरवणूक, सकाळी १० ते १२ ग्रामस्थांचे सुस्वर भजन, दुपारी १२ ते १२.३० वाजता श्रीराम जन्मोत्सव, १ ते २ वेळेत महाप्रसाद, दुपारी २.३० ते ४ वेळेत सत्यनारायणाची महापूजा आणि महिलांचे हळदी कुंकू, ४ ते ७ पालखी नृत्य, सायंकाळी ७ ते ८ हरिपाठ, रात्री ९.३० ते १० मान्यवरांचा सत्कार सोहळा होणार असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चिपळूण संगमेश्वर विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्री. शेखर निकम सर, माजी आमदार श्री. सदानंद चव्हाण, चिपळूण वाशिष्ठी डेअरी चे चेअरमन श्री. प्रशांत यादव, चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष श्री. नितीन (अबुशेठ ) ठसाळे, सरपंच श्री. अनिल भोजने उपस्थित राहणार आहेत.
रात्री १०.३० वाजता रसिक प्रेक्षकांसाठी कोल्हापूर येथील स्टार आॅर्केष्टा चे आयोजन करण्यात आले असून या दिवसभरात होणाऱ्या रामनवमी उत्सव कार्याक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन धामेली भोजने वाडी विकास मंडळाचे अध्यक्ष श्री. संतोष भोजने, सचीव श्री. सुदेश खताते (मुंबई ), ग्रामस्थ अध्यक्ष श्री. रामचंद्र भालेकर, ग्रामस्थ सचीव श्री. सुभाष ठसाळे यांनी आवाहन केले आहे.
![]() |