गिरणी कामगारांच्या प्रश्नावर सरकार गप्प का? - नारायण पांचाळ अध्यक्ष, जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र

 

पाचल लोकनिर्माण( अंकुश पोटले )

राजापूर - मुंबई ही कामगारांची,एके काळी गिरणी कामगारांमुळे मुंबई गजबजलेली होती,मात्र,गिरण्या बंद झाल्या आणि मुंबईतला गिरणी कामगार संकटात सापडला,तो स्थलांतर करू लागला,कोकणातले अनेक चाकरमानी गिरणी कामगार आपापल्या गावाकडे परतले,खऱ्या अर्थाने अशा गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळाले पाहिजे,आजच्या वृद्धावस्थेत सुद्धा शेकडो कामगार आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र येऊ शकतात याचा सरकारने विचार करायला हवा,गिरणी कामगार व कामगारांच्या वारसांची घराची मागणी रास्त असून अशा घटकांच्या पाठीशी आपण उभे राहणार असल्याचे पत्रकार नारायण पांचाळ यांनी राजापूरच्या मेळाव्यात प्रतिपादन केले.

     राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी गिरणी कामगार घरांसाठी पुकारलेला लढा न्याय असून या लढ्याला जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष तसेच ज्येष्ठ पत्रकार नारायण पांचाळ यांनी येथे गिरणी कामगार आणि वारसांच्या सभेत बोलताना पाठिंबा दिला आहे.सरकार दिवसागणिक अनेक प्रश्नांवर शासन निर्णय जाहीर करते, मग गिरणी कामगारांच्या प्रश्नावर गप्प का? असा सवाल नारायण पांचाळ यांनी आजच्या राजापूर सभेत केला आहे. गिरणी कामगार घराच्या प्रश्नांवर अनेक संस्था संघटनांकडून पाठिंबा मिळू लागला आहे.

  गिरणी कामगार घरांच्या रखडलेल्या प्रश्नावर राष्ट्रीय मजदूर संघाच्या वतीने अध्यक्ष सचिन भाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी बुधवारी महात्मा गांधी सभागृहात पार पडलेल्या कामगार आणि वारसांच्या सभेत सरकारला अल्टिमेशन देऊन एल्गार आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर कोकण व पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या गिरणी कामगारांमध्ये प्रचार दौरे आयोजित करण्यात आले आहेत.काल सावंतवाडी आणि कणकवली येथे कामगार आणि वारसांच्या सभा पार पडल्या.या जनसंपर्क अभियानाअंतर्गत आज राजापूर येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

*गिरणी कामगारांवर अन्याय का?* 

  देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत योगदान देणारा, मुंबईचा गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर मागे का? असा सवाल राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर यांनी केला आहे.गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर आलेल्या  अनेक संकटांवर संघाने वेळोवेळच्या लढ्याद्वारे 2मात केली आहे्. 


 *आता माघार नाही!*

   राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपा ध्यक्ष सुनिल बोरकर म्हणाले, गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर संघटनेने जे आक्रमक पाऊल उचलले आहे,ते कदापि मागे घेतले जाणार नाही.फॉर्म भरलेला अपात्र ठरता कामा नये.1982 नंतर कामावर आलेल्या कामगाराने एक जरी पुरावा दिला तरी तो ग्राह्य धरला पाहिजे. संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी तसा म्हाडाशी पत्र व्यवहार केला आहे. कामगार आयुक्तांनी या प्रश्नावर गांभिर्याने विचार करायचे ठरविले आहे.मुंबईत एकही गिरणी कामगार घरांच्या हक्कापासून वंचित रहाता कामा नये,हि संघटनेची भुमिका आहे 

  या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कानडे, प्रसिद्धी प्रमुख काशिनाथ माटल यांची भाषणे होऊन, कामगारांनी या लढ्यामागे‌ खंबीरपणे उभे राहिले पाहिजे,असे आपल्या भाषणात आवाहन केले.राजापूर तालुका उबाठा गटाचे‌ प्रमुख कमलाकर कदम यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरते.ते या सभेला आवर्जून उपस्थित होते.