मुंबई लोकनिर्माण (शांताराम गुडेकर )
दी.हायकोर्ट एम्प्लॉईज को.ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई यांच्या वतीने के.सी.कॉलेज ऑडीटोरियम विद्यासागर प्रिन्सिपल चर्चगेट मुंबई येथे सभासद व विद्यार्थी गुणीजनांचा गौरव समारंभ नुकताच पार पडला. या समारंभामध्ये कोकण सुपुत्र,उच्च न्यायालयाचे कर्मचारी समाजसेवक श्री. चंद्रकांत चंद्रभागा शिवराम करंबळे यांना पुणे येथे लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार मिळाल्याबद्दल व दिल्ली येथे अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी त्यांच्या वतीने मिळालेल्या मानद डॉक्टरेट पदवी पुरस्कारबद्दल दि हायकोर्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांच्यावतीने प्रमुख पाहुणे उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती श्री.जितेंद्र जैन साहेब मा.न्यायमूर्ती श्री. सोमशेखर सुंदरेसन साहेब मा.न्यायमूर्ती श्री.अव्दवैत एम.सेठना साहेब यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी संस्थेचे संचालक मंडळ श्री.सनी सुरेंद्र हौसलमल -(अध्यक्ष),श्री.चंद्रकांत सरवणकर(उपाध्यक्ष),सौ.अनघा करकंडे(सहकार्यवाह),श्री.विनोद भोसले(खजिनदार ),श्री.अमोल शिंदे(सहखजिनदार )'सदस्य - श्री दीपक धुमाळ,श्री.राहुल कदम,सौ.मुक्ता नागणे- कदम,डॉ.श्री अमोल राऊत ,श्री रवी पवार ,श्री राजेंद्र खिल्लारी तसेच संस्थेचे व्यवस्थापक श्री.संजय बेलोसे ,सहाय्यक श्री.विजय पवार, लिपिक सौ.मुसळे मॅडम व उच्च न्यायालयाचे अधिकारी व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.लांजा तालुका मधील गवाणे गावचे सुपुत्र मुंबई उच्च न्यायालयाचे कर्मचारी तसेच गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक श्री.चंद्रकांत चंद्रभागा शिवराम करंबळे यांना आजवर विविध संस्था, मंडळ, समाज शाखा, मीडिया यांच्यातर्फे विविध पुरस्कार, सन्मान पत्र प्राप्त झालेली आहेत.
उच्च न्यायालयाचे कर्मचारी,समाजसेवक श्री.चंद्रकांत चंद्रभागा शिवराम करंबळे हे गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत,याशिवाय जेष्ठ नागरिक समूहाला पाणी, बिस्कीट वाटप केले जाते.गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक श्री.चंद्रकांत शिवराम करंबळे आणि परिवार व पदाधिकारी, सदस्य, सभासद, हितचिंतक यांच्यातर्फे कोकणात दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येतात.शिक्षण,समाजसेवा, ग्रामसेवा, तंटामुक्त, कृषीसेवा, शेती विकास, कामगार, उद्योग, साहित्य, कला, क्रीडा, ग्रंथपालन, पर्यावरण आदी क्षेत्रात गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे.फळाची अपेक्षा न ठेवता सतत कार्य करत रहाणे हे गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक श्री.चंद्रकांत शिवराम करंबळे यांचा मूळ उद्देश आहे.गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत करंबळे अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हरसिटी (AIU)ची मानद डॉक्टरेट पदवी पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल दी.हायकोर्ट एम्प्लॉईज को.ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई यांच्या वतीने के.सी.कॉलेज ऑडीटोरियम विद्यासागर प्रिन्सिपल चर्चगेट मुंबई येथे सत्कार झाल्याबद्दल उच्च न्यायालयाचे कर्मचारी समाजसेवक श्री. चंद्रकांत चंद्रभागा शिवराम करंबळे यांचे मुंबई /ग्रामीण भागातील नागरिक यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.