मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी
मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले आहे. आज मीरारोड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. ‘वादळवाट’, ‘चार दिवस सासूचे’, ‘दामिनी’ यांसारख्या लोकप्रिय मालिका आणि अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती.काही वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता, तरीही त्यांनी जिद्दीने या आजारावर मात करत पुन्हा काम सुरु केले होते.
त्यांच्या निधनाने मराठी कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून, सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. खासदार अमोल कोल्हे यांनीही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.