पाचल /लोकनिर्माण (अंकुश पोटले)
राजापूर तालुक्यातील जिजामाता विद्या मंदिर रायपाटणच्या माजी विद्यार्थी इयत्ता दहावी बॅच 2017 -18 च्या बॅच कडून विद्यालयाला विविध क्रीडा साहित्याची देणगी स्वरूपात साहित्य देण्यात आले.जिजामाता विद्या मंदिर रायपाटण येथे इयत्ता आठवी ते दहावी पर्यंत विद्यार्थी शाळेमध्ये शिकत असून शाळेच्या माजी विद्यार्थ्याकडून क्रीडा साहित्य देणगी स्वरूपात देण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक दामोदर लिंगायत ज्येष्ठ शिक्षिका पल्लवी सावंत, क्रीडा शिक्षक सुनील कुंभार, सहाय्यक शिक्षक गौतम पांगरीकर, शिक्षकेतर कर्मचारी संदीप कोलते, सुरेश कांबळे आदी उपस्थित होते.त्याचबरोबर इयत्ता दहावी बॅच सन 2017- 18 चे विद्यार्थी यश पराडकर, चैतन्य शेटे, नयना शेटे बन्शी मालप,अतुल गांगण,, गौरव कामतेकर, सौरभ जड्यार, चिन्मय नेवरेकर, प्रतीक्षा जड्यार,पल्लवी कामतेकर,स्नेहा पांचाळ,सिद्धी चौगुले श्वेता इस्कार, धनंजय खोचाडे,शालिनी वापीलकर, वैष्णवी खाडे,अंजनी पांचाळ, अवधूत गांगण,अनुजा शिंदे आदिचा या देणगीमध्ये समावेश आहे या क्रीडा साहीत्या मध्ये बॅडमिटन रॅकेट 3 सेट,दोरी उड्या रशी 12 नग, बॅडमिटन शटल कॉक,रबरी बॉल १२ नग, टेनिस बॉल 3, प्लॉस्टिक बॉल 12 नग, लगोरी सेट १,व्हॉली बॉल १, बुद्धीबळ सेट 2 नग,त्यांनी दिलेल्या या देणगी बद्दल रायपटन गावकरी संघाचे सर्व संचालक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून विद्यार्थ्यांना धन्यवाद देण्यात येत आहे.