कळंबस्ते येथे विद्युत पोल ( लोखंडी खांब )मोजतायत अखेरच्या घटका; ग्रामस्थानी कळहुनही विद्युत कार्यालयाचे दुर्लक्ष! कसबा महावितरण कार्यालय बघ्याच्या भूमिकेत

 

संगमेश्वर लोकनिर्माण/ सत्यवान विचारे

संगमेश्वर पासून सहा किमी अंतरावर असणाऱ्या कळंबस्ते मोहल्ला येथील काही विद्युत पोल ( लोखंडी खांब) पूर्णतः सडले असल्याने ते कधीही जमीनदोस्त होऊ शकतात

अनेक विद्युत पोल वाकलेले आहेत त्यामुळे जोराचे वादळ वारे आल्यास हे खांब कोसळून जीवित हानी होण्याचीचीच शक्यता असल्याने महावितरण कंपनीच्या हलगर्जी पणा मुळे गंभीर घटनेला आमंत्रण देत आहेत.

येथील ग्रामस्थानी अणेक वेळा महा वितरण च्या कसबा  कार्यालयाला कळवले आहे. आणि येथील महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक्ष दाखवले ही आहे.

मात्र येथील कार्यालयाकडुन कधी पोल नाहीत, तर कधी मनुष्य बळ कमी आहे अशी कारणे देत महावितरणचे कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी येथील ग्रामस्थ्यांच्या जीवlशी खेळत असल्याचे दिसत आहे.

येत्या आठ दिवसात हे खांब बदलले नाहीत तर महावितरण कसबा कार्यालया समोर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा येथील ग्रामस्थ राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हापाध्यक्ष श्री, मज्जीद भाई नवरेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.

Popular posts
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची “अंमली पदार्थ विरोधी कारवाई”. रत्नागिरी शहर परिसरात “गांजा” सदृश अमली पदार्थासह “एक जण ताब्यात”
Image
मन: सामर्थ्यदाता या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या अनुभवसंकिर्तना सह भक्तीरसनाचा सत्संग सोहळा उत्साहात संपन्न
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
रेडी रेकनर दरात दोन वर्षांनी वाढ; महानगरपालिका क्षेत्रात ५.९५ %तर ग्रामीण भागात ३.३६% वाढ, आजपासून नवे दर लागू