शिरगाव रस्ता पास असूनही ३ वर्षे पीडब्लूडि ची टोळवा टोळवी!

खेड लोकनिर्माण (काका भोसले )

खेड तालुक्यातील एक भयानक प्रकार उघड झालाय. शिरगावचा डांबरीकरण रस्ता 2022 मध्ये पास होऊन त्याचे आमदार फंडातले 66लाख 50 हजार येऊनही भोसलेवाडी ते पिंपळवाडी असा 6 किलोमीटर चा रस्ता न झाल्याबद्दल शिरगाव गाव चक्राऊन गेले आहे. 

या संदर्भात माहिती अशी की, 2022 ला शासनाने एक विशेष टेंडर काडून हा रस्ता पास केला. पण दोन पावसाळे गेले तरीही याचे डांबरीकरण अथवा दोन ब्रिज बांधले गेले नाहीत. या संदर्भात विचारणा केली असता असे कळले की पिंपळवाडी ते रघुवीर घाट असा चुकीचा नंबर पडला, पण ठेकेदार सचिन एस. रेडीज यांनी शासनाने वेळेवर पैसे दिले नाहीत म्हणून काम बंद केले आहे.  पण मुळात प्रश्न असा आहे की अडदसवाडी ते पिपळवाडी हा रस्ता कुणाच्या धाकामुळे बनला नाही! मुळात हा रस्ता तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात पास होऊनही झाला नसल्याने आश्यर्य व्यक्त केले जात आहे. पाच वाडीतील शेतकरी वर्ग व सामान्य माणसे हवालदिल झाली आहेत. या रस्त्या संदर्भात अनेक लोकांनी पत्रव्यवहार केला पण खेड उप अभियंता यांस दाद देत नाहीत.